सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११

उंच आकाशी उडताना

(उंच आकाशी उडताना या ओळीवर लिहिलेली माझी कविता)












आई हात तुझा सोडताना,
डोळ्यांत अश्रू असताना,
शाळेची पायरी चढताना ,
वाटत होता एकटेपणा...
उंच आकाशी उडताना

माझ्यासाठी धडपडताना,
रात्र-रात्र जागताना,
बोचत होते माझ्या मना,
सार्थक याचे करावे
वाटत होते क्षणा-क्षणा,
उंच आकाशी उडताना

तुझं स्वप्न साकारताना,
एक-एक कसोटी उतरताना,
अर्पित होतो तना-मना
उतरवित होतो ...
माझ्यात मी तुझ्या स्वाभिमाना,
उंच आकाशी उडताना

तुझ्या संस्कारांकडे न केला डोळा काना,
आज अश्रू दाटे या नयना,
'आई' तुझ्या विना आज आहे उणा,
उंच आकाशी उडताना

काय चुकल होत....??

खरंच काय चुकलं होतं....??
खरंच कुणाचं चुकलं होतं....??
खरंच कधी चुकलं होत....??
मला खरंच माहीत नाही ....
पण त्या संवादाची जागा ..
असह्य अबोल्याने घेतली होती .....
प्रेम नव्हतेच कधी ..निदान मैत्री तरी होती !!
जागेपणात नाहीच कधी ...पण भेट स्वप्नात होत होती ..!!!
आता झोपच लागत नाही...मग स्वप्न कुठून पडणार ..??
माझ-तुझंच भिनलय...तर आपलं कधी होणार ..??
.
.

तू गेल्याने फरक पडणार नाही ...
कारण सारेच सोडून गेले ..!!
फक्त काही अश्रु नि ...आठवणी सहाव्या लागतील...
बाकी सारेच तू नेले ...!!
खरचं चुकलं कुठे नि कुणाच मला माहीत नाही ....
पण तुझी आठवण मी जगत राहीन ...!!
माझ्या शब्दांत तुला शोधत जाईल...
पण मला खरंच माहीत नाही काय चुकलं होतं ...??

वियोग

विझू लागतात कधी-कधी संदर्भांचे दिवे ..
तरी जाग्या झाल्या आठवणी ...
खोलवर पिलवतुन टाकतात विरहाच्या दुखाने ....
मग मागल्या आठवणी मी आठवू लागते ...
पण ....अर्ध्या अधिक कालाच्या ओघात भरकतल्या जातात ...
मग वियोगाच्या गर्तेत खोलवर जाताना ....
आसवाना "ही" करुन दिली जाते वाट ...
खोलवर रुतनारी ,ही भलभलनारि जखम घेवुन,
जगायला खरतर अश्वत्थाम्याकडूनच शिकायला हव होत........
अस आतून वाटत राहत ....
निर्माण झालेली ही "अर्थशुन्येतेची पोकळी" ,
का भरून येईल कधी ...??

नात

नात असत युगायुगाच...

रेशमी भावबंधनाच

तुटत नाही जन्मोजन्मी ...

नेहमी असतो आपण त्याचे ऋणी

नात निर्माण करत एक मायेच बंधन ..

मानस असतात दूर-दूर तरी हृदय करत वंदन !!

भेटी

भेटी विरत जातात ...

गाठी रुजत जातात ..

गंध पेरत पेरत ...

वारा धुंद करतात ..

पावलामागे हाच वारा ..

मनाला बेधुंद करतो .....

कोण्या एक कातरक्षणी ....

साद घालित येतो .......

ती

संध्याकाळी त्या प्रथम त्याला तिने पाहिले ..
मनविणेचे सुर मग कधी नव्हे ते छेडले ..
सुरानी तिच्याच ...तिच्यात त्याला गुंफले
'निजेला' डोळ्यांतुन स्वप्नानी 'त्या' चोरले
मग श्वासानी त्याच्यात तिने स्वताला बांधले
'मी'पणाचे मोती हळूच तेव्हा निखलले
संगमाला मग नदीने टाकली ती पावले !!
हिन्दोल्यावर एक सुरेख घरटे ते बांधले
सुख-दुःखाचे क्षण तिने पेटित त्या जपले
पापन्यातले ओझे गालावर सांडले !!
अर्ध्यावर जेव्हा जग त्याने सोडले
पदराने हळूच दुःख तिने ते लपवले
पाखरांचे घरटेही तिनेच सांधले
उंबरठ्यावर उभी ती ..पिलाला विचारले
गुन्हा काय माझा ?...म्हणून हाल जाहले !!

एकतर्फी प्रेम

मी सगळ्यात सुखी कारण....
मी कमी दुखी.........
माझ दुःख एकच...... "एकतर्फी प्रेम"

मझ्याकडूनच फक्त ते...... म्हणुन एकतर्फी ते.....
ते विसरल की.... मात्र मी खुप सुखी...!!!

गर्दीत त्याला पहिल्यांदा पाहिले...
नि घोळक्यात त्याला मीही दिसले...
माणुस आपल हेच.... माझ्या नजरेने हेरले
सोबत यालाच द्यायची.....
मग मनाला पटले .....
म्हणुन मी एकतर्फी प्रेम केले ....

हलुहलु ...मैत्री होत गेली...
मग जवलिकहि वाढवत नेली....
प्रेमाची एक-एक पायरी मी चढत गेली.....
.....पण कधी त्याला नाही सांगितले.....
कारण मी एकतर्फी प्रेम केले ....


मी स्वप्नात रमले....
दिवस जात राहिले....
एके दिवशी....
त्याच्या लग्नाचे निमंत्रण मिळाले..
'साज' चढ़वून लग्नात मैत्रिण म्हणुन मिरवले....
कारण मी एकतर्फी प्रेम केले....


दोनाचे चार त्याचे झाले.....
वर्षात घराचे गोकुळ बनले....
मी मात्र एकतर्फी प्रेम केले....

सोबतीण त्याला सोडून गेली.....
'मैत्री' म्हणुन मी धावून गेली....
त्याच्या पिलाची आई नि घराची सुन झाले....
कारण मी एकतर्फी प्रेम केले .....


किनारयावर बसूनही तिष्टत राहिले.....
एक 'स्पर्शासाठी' तहानलेले ...
कारण मी एकतर्फी प्रेम केले ......!!!!

वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही "
(जर कुणाला कवी ठाऊकअसतील तर कृपया सांगावे )
या ओळीवर लिहिलेली माझी कविता


स्थिरावलेली ती नजर सांगते कधी मलाही...
तुझ्या इतकीच जाणीव आहे रे मलाही
पाहून तुला लिहिली पहिली ओळ आठवते आजही...
वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

मिलनाचा गोडवा निराला म्हटल जरी कुणीही...
विरहाशीच प्रेम करू आपण दोघेही
नाहीच जमल तर स्वप्नात भेटू आजही!!
वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

गहिवरून खरतर येत कधी मलाही ...
कातरवेली रडावस वाटत असेल तुलाही
व्यस्त बंधनात जरी तू आणि मीही ..
वीण तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही

नेहमीच उन नसत ..दिवस जातील हेही
अंगनातल चांदन पाहशील तेव्हा तुही ...
शब्दांसंगे एकच असतील जेव्हा सुरही
वीन तुझ्या माझ्या नात्याची उसवणार नाही कधीही !!

कविता

संसाराच्या पसारयात या असच असत जगायच
रडता रडता हसायच
नि हसता हसता हसवायच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

धाप लागेल म्हणुन नसत कधी थामबयाच
लागेपर्यंत धाप नसतच कधी धावायच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

गर्दीतही एकटे अगदी
नि दुखातही आनंदी
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

अहंकाराच्या धुक्यात नसतच हरवायच
या इथे स्वतास स्वताला सावरायच
कधी कुणाचा आधार बनायच
मग आशेने आधाराच्या नाही थामबयाच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

भरारी घेताना मातीला धरायच
स्वप्न नि ध्येय यातल अन्तर मापायच
उंच जीतक ध्येय तितक दूर चालायच
नाही साधल म्हणुन नसतच खचायाच
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच ...

फिनिक्स बनुन राखेतून नवी झेप घ्यायची
बोथट झाल्या खडगेला धारदार करायची
संसाराच्या पसारयात या असच असत जगायच