गुरुवार, ३ मार्च, २०११

जीवन म्हणजे ....

जीवन म्हणजे संघर्ष
कधीच नसतो
जीवन म्हणजे नदीचा
प्रवाह असतो.....
ज्याला ओढ असते
वळणांची
ज्याला ओढ असते
ध्येयांची...!!

आई..

’आई’ असते पहिला गुरु
सारया जगताचीच ती ’कल्पतरु’..

ओल्या मातीच्या गोळ्याला आकार ती देते
तिच्या बिलाची पावती सदैव रिकामीच असते

आयुष्याच्या अखेरही मुखी नाव असते
’आई’ हेच ते अतुलनिय नाम असते

’आ’ म्हणजे ’आत्मा’,’ई’ म्हणजे ’ईश्वर’..
मातेचा विजय असतो सृष्टीच्याही अखेर...!!

मी शोधली आहे

आज जखमेवर माझ्या मीच मलम लावू लागली
गतकाळाला माझ्या कोपरयातून पाहू लागली
वाटत होती पहाडाएवडी ती गोष्ट आज निष्फळ ठरली
उगाचच दु:खाला मी चघळत राहीली
.
.
.
मग खिडकीतून तिरीप उन्हाची नकळत बिलगून गेली
रात्र सारी जागून काढली तेव्हा जाणीव झाली
रातीसोबत गतकाळालाही मागे सोडलं मग
कोंब फुटून ’आशेनं’ नव्याने धरीला तग...
आकांक्षांच्या पंखांना आता बळ दिलं
’उडूया नव्याने’ मनाला आव्हान केलं
.
.
जखमेवरही आता खपली धरली आहे
माझ्यातल्या ’मला’ मी शोधली आहे

सुरुवात :एक अभंग

विसरले आहे
कालचे मी सर्व
सुरु नवे पर्व
केले आता ॥१॥

आकांक्षांच्या पंखा
दिली नवी दिशा
मनी आता आशा
जिंकण्याची ॥२॥

मार्गात आलेले
झेलेणं हरणं
पेलेणं जिंकण
स्थितप्रज्ञी ॥३॥

जिवीत ध्येयाची
जिद्द आहे उरी
अपयश जरी
झेललेले ॥४॥

एक नवा सुर्य
उगवतो आहे
माझ्याकडे पाहे
आशेतुन ॥५॥

तेजोमय रुप
घेतले ते आत
पसरुनी हात
स्वयंस्फूर्ते ॥६॥

माय मरतेय

रस्त्यांवरुन,कार्यालयांतुन..
राजधानी मुंबईतुन..
रोजच मी पाहतेय....
’मायमराठी’क्षणोक्षणी मरतेय...!!


’सर्व शिक्षा अभियान’झाले दिल्लीत
’शिक्षा’चे’शिक्षण’ न केले मुंबईत
ईमान राखीत दिल्लीशी
’शिक्षाच’गेली खेड्यापाड्यात
सांगा खरच ’मराठी’ टिकतेय....?
लोकहो.. माय माझी रोज मरतेय...!!


मुख्यमंत्री होताच
’मुंबई’ चे ’बंबई’ केले
अवघ्या नांदेडात मग
’मराठी’ बोलणे कठीण झाले


पाटी विमानतळावरची हिंदीत पाहीली
’मराठीबाण्याने’चौकशीस मी धजली
’निकास’ म्हणजे ’बाहेर’ नि
’पूछताच’ हिच ’चौकशी’...
हिच तर मराठी म्हणून ’जनता’मला हसली


’पिवळे ते सोने नसते....
देवनागरीतले सारे मराठी नसते’...
कळण्यास खुप उशीर होतोय..
तोवर मायेचा लचका कुठेतरी तुटतोय ...!!


खुर्च्यावाल्यांना नसेल मायेची फिकीर
माय सांगतेय तु सोडू नकोस धीर
...मी धीर नाही सोडलाय...
नाळ तिश्याशी जोडलाय...
वाचवायचा तिला जरी प्रयत्न करतेय....
रोज माय तरी कुढत कुढत जगतेय...!!


(श्रिपाद ब्रह्मानंद पांडे लिखीत ’लिपीसाधर्म्याआडून मराठीवर अविरत वार’ लेखावर आधारीत(दिनांक:५/१/२०१०))

कळी फुलली......

एक होती कळी
खोलत नव्हती पाकळी
जाऊन तिच्या जवळी
म्हटले तिला खुळी

कळी हलकेच हिरमुसली
मग कहानी सांगू लागली
"किरणास आजवर न बिलगली
भ्रमरासोबत कधी न गुणगुणली
फुलण्याची आशा मनीच कोमेजली"
.
.
तिला म्हटले "अग खुळे
निट उघड डोळे
नि बघ जग वेगळे
तुझ्याहूनही दु:खी सगळे
तरी फुलवी सुंदर मळे
जगण्याचे तंत्र त्यांस कळे"
.
.
पाहुन तिच्याकडे पुन्हा हसले
तुझ्यासारखी मुङ होते म्हटले
’फुलण्याचे’ कर्तव्य उमगले
भ्रमराचे वेड मग पळाले
.
.
कळीला जगण्याचे ’सारं’ समजले
तिचे शंकानिरसन झाले
हलकेच तिने अभिवादन केले
कळीला तेव्हा मी फुलताना पाहीले....!!

...................

क्षितीजावर टेकेल आभाळ
वाट ही पाहिली
सावली होशील माझी
साहिली कधि काहिली
जल नव्हे मृगजळ तू
तहानलेली राहिली
वळणावर आज पुन्हा
जाहली मी एकली
-----अपेक्षा चौधरी

रामशास्त्री पुन्हा अवतरतील का?

युगायुगातुन एकदा अवतार माझा होतो
कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ आज पटतो

रामशस्त्रींना नाही झाले ३०० वर्षे अजुन
पुढिल १०००-२००० वर्षे मग न्याय राहील झोपून

’ईश’ लोपला आहे आजच्या ’न्यायाधिशात’
(न्याय+ईश)
शास्त्रीनंतर न्याय रडतो आहे अंधारात

तासभर आधी निवृत्तिच्या पदोन्नती होते
’पेन्शनच भारी लोणी’ आपसुक पदरी पडते

लाखात घेऊन जमीन ’कोणी’ करोडोंना विकतो
काळ्या कोटाखाली सहज भ्रष्टाचार झाकतो

तिथेही आहेत जी न्यायप्रिय माणसे
त्यांनाही जीवन हे झालेय नकोसे

खातेय शेत कुंपणच..तर जायचे कुणाकडे..?
न्यायदेवताच न्यायासाठी घालतेय हो साकडे..!!

न्यायाधिश झालाय केवळ ’शिक्षावादी-दंडाधिकारी’
संपलेत शास्त्री जो पेशव्यालाही दंड करी....!!

फुटेल का कधी पापाचा हा घडा ...?
शास्त्री अवतरतील का शिकवण्यास धडा..?


(कॅप्टन आनंद जयराम बोडस लिखीत ’हवे आहेत रामशास्त्री’ या सकाळमधील लेखावर आधारित)

एक इवलं पाऊल

एक इवलं पाऊल
माझ्या घरात पडलं
घर माझ हरकल
खळी पाडून हसलं

एक इवलं पाऊल
मिठीत शिरल
स्पर्शाने नि:स्वार्थ
तन-मन शहारल

एक इवलं पाऊल
खुदकन हसल
पाहून सांगू कशी
किती मन आनंदल

एक इवलं पाऊल
दुडूदुडू धावल
घराला मझ्या
गोकुळ बनवून गेल

एक इवलं पाऊल
’मावशी’ म्हटल
तेव्हा खरच मन
पाखरु-पाखरु झालं

एक इवलं पाऊल
सर्वस्व बनल
नजरेत त्याच्या
जग माझ दिसल

एक इवलं पाऊल
सुख देऊन गेलं
दु:खाला त्याने
पळवून लावल....!!

दादा

’आई’ म्हणतात पहिल्यांदा
मी म्हटले ’दादा’..!!

सारयांच्या ’आखों का तारा’
आई-बाबांच्या नजरेतला ’हिरा’
सगळयांची काळजी घेणारा
सगळ्यात पहिला येणारा
हास्य पेरत जाणारा
माझा ’दादा’..!!


क्षणात आपलस करुन घेणारा
स्वत:च अस्तित्व असणारा
एक स्वाभिमान जपणारा
पण अहंकार नसणारा
हिंमतीवर जग जिंकणारा
माझा ’दादा’..!!


माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा
भातुकलीत माझी साथ देणारा
कधी माझ्यासाठी खोट बोलणारा
ठेच मला लागल्यावर दुखावणारा
माझ्या जखमेवर हळुवार फुंकर घालणारा
माझा ’दादा’..!!


अलगद कोडी घालणारा
गणित चुकल्यावर ’धपाटा’ देणारा
मग शंकांची उकल करणारा
खुप खुप धम्माल करणारा
माझा ’दादा’..!!


त्या दिवशीही मी त्याची वाट पाहिली
दमुन मग झोपी गेली
रात्री फोनची घंटी वाजली
तो ठेवल्यावर आई ओक्साबोक्शी रडली
.
.

कधी नव्हे ते बाबाही रडले होते
काय झाल ..?मला काहिच कळले नव्हते

’दादा’ला घ्यायला बाबा,काका गेले होते
मी सार नुसतच पाहत होते
.
.

१ जानेवारी ,२००८ उजाडले होते
थंड दादाला घेऊन सारे ’परतले’ होते
जुन्या वर्षाने सोबत दादाला नेले होते
माझे ’चैतन्य’ हरवले होते
’दादा’ने मला एकटे सोडले होते ........
कायमचे....!!

थंडी ’ती’ नि ’ही’

आजी सांगायची....
म्हणे तिच्या लहानपणी
गोठवणारी थंडी असायची
जाड-जड वाकळ,शालीची
पांघरुन घ्यायची
वाफळणारया पाण्याने
आंघोळ करायची
आई तिची म्हणे
गुळ-खारकेचे लाडू बांधायची
संक्रांतीला मग
तिळांची चंगळ व्हायची
.
.
.
तशी आमच्या बालपणीही
थंडी बरयापैकी पडायची
पहाटेच मी ’बदामी’कडे वळायची
गरम दुधाच्या धारा अंगावर घ्यायची
’बदामी’ला नसेल का थंडी लागत
विचारून सारयांना भांडावून सोडायची
’मोत्या’साठी गोणींची गादी अंथरायची
नाक मुरडून खारकेचे लाडू खायची
.
.

मग मझ्यासोबत थंडीनेही रूप बदलत नेले
मी मात्र आजोळच्या थंडीच्या शोधात गुंतले
कधी माथेरान तर कधी शिमला गाठले
आजीच्या काढ्यांसाठी कधीच मुकले
.
.
.
आता खारकेच्या लाडवांना कुणीच विचारत नाही
’सायी’ची सर व्हॅसलीनला नाही
.
.
आज बस करीयची घाई
आला दिवस धावण्यात जाई
.
.
आताशा थंडीच पडत नाही
स्वेटरच गाठोड फडताळात राही
मग उगाच वाटत...
’यातल एखाद कार्व्हरला द्याव’......
फक्तच वाटत....
.
.
थंडीची थंडाई कमी झाली
कि कातडी गेंड्याची
की सारया निसर्गावर ’करणी’ मानवाची
विचारांच्या गर्दीत झोप हरवायची
संधीच निसटते मग थंडी अनुभवायची.....!!

शिक्षा ...

सोडून जाणार नाही तुला
तू म्हटल होतस
दोन जीवांच्या मला
मग एकट कस सोडलस...!!

चुक माझी नव्हती फक्त
आपली होती ती
क्षणिक जवलिक जास्त
कुमारिमाता बनली होती ...!!

जगाला भिउन पावुल
मागे घेतल काही
एक जीव मारल्याची
कट्यार काळजात राही...!!

सात पावल पडली
मी 'सौ' झाली होती
सार होती विसरली
नव्याने रंगल्या राती ...!!

घराण स्वप्न पाहिल
'गोकुळ' बनायाच
'गोल गोल पानी ' म्हणत
फेर धरून नाचायाच ...!!
.
.

पण विपरीत घडायच होत
भुतकालाने 'पत्र' धाडल होत
चुकीने 'शिक्षेच दान' दिल होत...!!
मला वांझोट केल होत
मला वांझोट केल होत ...!!

शंकेशिवाय .....इंजिनियर ....!!

मी म्हणजे एक 'query' आहे ..
बाकी 'लई' भारी आहे ...!!
म्हणे प्रत्येकात असतात काही गुण
माझ्यातले तेच लोकांवाटे अवगुण ....!!
लहान असताना आई कंटालायची
नंतर-नंतर शंकानिरसन टालायची .....!!
मग होते शाळेत गेले
तिकडे शिक्षकही कंतालले.....!!
colleजात सुधरेन म्हटल
तिथेही तेच 'अघटित' घडल ....!!
मग म्हटल आता काही करायला हव
सरयाना दाखवाव आपल 'रूप नव'....!!
CETत घासघास 'घासले'
नि झक्क marks आणले ....!!
.
.
medicalचा रस्ताच टाळला
उगा 'फीच'भुत मानगुटीवर कशाला ....!!
तसही तिथे खुप शंका आल्या असत्या ..
'Sr DOC'साठी ज्या चौकशा नुसत्या ...!!
गुपचुप enggचा फॉर्म भरला ..
पहिल्या CAPमध्येच नंबर लागला ....!!
झटपट admission घेतली
'पहिल्याच दिवशी ' हजेरी लावली ....!!
तिकडे होती मज्जाच मज्जा ..
raggingची भारी सजा ....!!
सार 'निपचित' पार पडल ..
lecture सोडून सर्व घडल ....!!
म्हटल आज नहीं तो 'कल कुछ होइल '..
काय माहीत(?) SEM अशीच जाइल....!!
इथे एक बर असत
नवापुरातेच sir फक्त ...!!
syllabus COVER झाला तरी
सार काही bouncer असत ....!!
कुणी फक्त attendance देतो
आम्ही मग proxy मारतो....!!
आता शंकाच येत नाहीत..
असतो फक्त 'self study'च्या घाईत....!!
आई म्हणते पोरगी बरी 'सुधारली'..
'शंका प्रेमातून 'सावरली .....!!
तिला कोण सांगणार ...(?)
"Enggला शंका वाचून काहीच अडत नसत ...
इकडे बस घोकून-घोकून इंजिनियर व्हायच असत "....!!


(माझ्या शंकांच निरसन होत नसल तरी तुमच्या होवो .....engg-engineering,sr.doc-senior doctor ,CAP-Centralised Admission Process,SEM-semister... 4 any doubt बेधड़क v4a).

प्रश्न तेच................

प्रश्न तोच 'कसाब'चे काय...?
उत्तर तेच 'शोध' सुरु हाय..!!

आहे 'ती' प्रगती....
की निव्वळ शरणागती.......?

कुणी सांगेल का ......
विकासाची ही कोणती गती.....?
की राजकारनाची नवी रीती .....!!

आम्ही असेच थंड राहणार .....
की पेटून काहीतरी करणार ......?

या आणि वार करा ...
आम्ही अहिंसेचेच पाइक होणार ......?
प्रश्न तेच ......सुरक्षेच काय ....?

मी प्रेमात पडली आहे !!

मी अलगद जवळ जाते ....
थोडस 'अंतर' कमी करते
नि..तासनतास गप्पा मारते

सांज उलटून रात्र होते...
मग घराकडे वलते

रात्री पुन्हा भेटते ...
आता मला झोप येत नसते ..
मग त्यांच्या 'मिठीची' चादर करते

अस गेले कित्येक दिवस चालू आहे
नि रोज़ नव्यानेच आमची भेट होत आहे

अताशा एकांत ही हवासा वाटतो
निदान तेव्हातरी आम्ही 'एकटे' असतो !!

उगाचच असलेली गर्दी नकोशी होवू लागली आहे
कशी कोण जाणे मी शब्दांच्या प्रेमात पडली आहे !!

एका क्षणात ....

त्या एका क्षणात
रडूनि हसले मीच माझे ..

त्या एका क्षणात
हरुनी जिंकले मीच माझे..

त्या एका क्षणात
भिजले सारे क्षण कधीचे ..

त्या एका क्षणात
जगले जगने मी कधीचे ...

आठवणी..

आठवणीची नि माझी
गट्टी फार आहे ..
दूर माणसे गेली
तरी त्यांना धार आहे ..

काही क्षण साथितले
तर... काही विरहातले..
तुझ्यासंगे अनुभवल्या
दुखाच्या सुखातले..!!
रंग उडून गेले ..
गंध विरून गेले..
मन हे ओथंबले
आज चिंब चिंब नाहले

आठवणीत रे डोळे भरून आले ....
तुझ्या आठवणीत रे डोळे भरून आले ....