गुरुवार, ३ मार्च, २०११

थंडी ’ती’ नि ’ही’

आजी सांगायची....
म्हणे तिच्या लहानपणी
गोठवणारी थंडी असायची
जाड-जड वाकळ,शालीची
पांघरुन घ्यायची
वाफळणारया पाण्याने
आंघोळ करायची
आई तिची म्हणे
गुळ-खारकेचे लाडू बांधायची
संक्रांतीला मग
तिळांची चंगळ व्हायची
.
.
.
तशी आमच्या बालपणीही
थंडी बरयापैकी पडायची
पहाटेच मी ’बदामी’कडे वळायची
गरम दुधाच्या धारा अंगावर घ्यायची
’बदामी’ला नसेल का थंडी लागत
विचारून सारयांना भांडावून सोडायची
’मोत्या’साठी गोणींची गादी अंथरायची
नाक मुरडून खारकेचे लाडू खायची
.
.

मग मझ्यासोबत थंडीनेही रूप बदलत नेले
मी मात्र आजोळच्या थंडीच्या शोधात गुंतले
कधी माथेरान तर कधी शिमला गाठले
आजीच्या काढ्यांसाठी कधीच मुकले
.
.
.
आता खारकेच्या लाडवांना कुणीच विचारत नाही
’सायी’ची सर व्हॅसलीनला नाही
.
.
आज बस करीयची घाई
आला दिवस धावण्यात जाई
.
.
आताशा थंडीच पडत नाही
स्वेटरच गाठोड फडताळात राही
मग उगाच वाटत...
’यातल एखाद कार्व्हरला द्याव’......
फक्तच वाटत....
.
.
थंडीची थंडाई कमी झाली
कि कातडी गेंड्याची
की सारया निसर्गावर ’करणी’ मानवाची
विचारांच्या गर्दीत झोप हरवायची
संधीच निसटते मग थंडी अनुभवायची.....!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा