मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

............

जोरदार वादल उठत ...
दोघ-तिघ उध्वस्त होतात ...
बाकी त्यांच सांत्वन करतात ...
मग,कधीतरी वादल निवत ...
सर्व काही 'सुरलित' चालत ..
त्याच वाटेवर म्यरेथोन धावत ..
उध्वस्त डोळ्यातले आसू आटतात...
गडद अंधारात 'ते' धडपडतात ....
आता मात्र कुणालाच 'त्यांची' कालजी न्हाई...
कुणालाच मदतीची नाही घाई....
अशी वादल होत राहतात ...
होणारे उध्वस्त होतात ...
मंत्री आश्वासन देत राहतात...
निवडून आल्यावर सारेच..'सारेच' विसरतात ...

आठवणी..

आठवणींची न माझी
गट्टी फार आहे ..
दूर माणसे गेली
तरी त्यांना धार आहे ..

काही क्षण साथीतले
तर... काही विरहातले..
तुझ्यासंगे अनुभवल्या
दु:खाच्या सुखातले..!!
रंग उडून गेले ..
गंध विरून गेले..
मन हे ओथंबले
आज चिंब चिंब नाहले

आठवणीत रे डोळे भरून आले ....
तुझ्या आठवणीत रे डोळे भरून आले ....

स्त्रिसाठी

तुझा तुझा नि तुझाच....
होवून उरतो जेव्हा
गर्क असते तू दुसऱ्याच ...
कोणा कामात तेव्हा
पहाटेच्या पाचपासून रात्रीच्या अकराचा
तुझा ऑफिस टाइमच अजब वाटतो !!
स्वत:च्या 'या वेळासाठी'
कधी तुझ्यापाशी वेळच नसतो ...
तू पत्नीची आई होता
घर आनंदून जाते !!
गृहिणी होताच तुझ्यातल्या
स्त्रीलाच का विसरून जाते ?
स्वत:चाही कधीतरी वेगला
परिघ निवडून पहा
स्वच्छ आकाशात या
स्वच्छंदीपणे उड़त रहा
चिमणा पिल्ले निघून जाता ...
निराश तू होवू नकोस
खरंतर याच वेळी स्वत:साठी
जगुन तू बघ 'भरघोस' ...!!