गुरुवार, ३ मार्च, २०११

रामशास्त्री पुन्हा अवतरतील का?

युगायुगातुन एकदा अवतार माझा होतो
कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ आज पटतो

रामशस्त्रींना नाही झाले ३०० वर्षे अजुन
पुढिल १०००-२००० वर्षे मग न्याय राहील झोपून

’ईश’ लोपला आहे आजच्या ’न्यायाधिशात’
(न्याय+ईश)
शास्त्रीनंतर न्याय रडतो आहे अंधारात

तासभर आधी निवृत्तिच्या पदोन्नती होते
’पेन्शनच भारी लोणी’ आपसुक पदरी पडते

लाखात घेऊन जमीन ’कोणी’ करोडोंना विकतो
काळ्या कोटाखाली सहज भ्रष्टाचार झाकतो

तिथेही आहेत जी न्यायप्रिय माणसे
त्यांनाही जीवन हे झालेय नकोसे

खातेय शेत कुंपणच..तर जायचे कुणाकडे..?
न्यायदेवताच न्यायासाठी घालतेय हो साकडे..!!

न्यायाधिश झालाय केवळ ’शिक्षावादी-दंडाधिकारी’
संपलेत शास्त्री जो पेशव्यालाही दंड करी....!!

फुटेल का कधी पापाचा हा घडा ...?
शास्त्री अवतरतील का शिकवण्यास धडा..?


(कॅप्टन आनंद जयराम बोडस लिखीत ’हवे आहेत रामशास्त्री’ या सकाळमधील लेखावर आधारित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा