गुरुवार, ३ मार्च, २०११

दादा

’आई’ म्हणतात पहिल्यांदा
मी म्हटले ’दादा’..!!

सारयांच्या ’आखों का तारा’
आई-बाबांच्या नजरेतला ’हिरा’
सगळयांची काळजी घेणारा
सगळ्यात पहिला येणारा
हास्य पेरत जाणारा
माझा ’दादा’..!!


क्षणात आपलस करुन घेणारा
स्वत:च अस्तित्व असणारा
एक स्वाभिमान जपणारा
पण अहंकार नसणारा
हिंमतीवर जग जिंकणारा
माझा ’दादा’..!!


माझ्यावर जिवापाड प्रेम करणारा
भातुकलीत माझी साथ देणारा
कधी माझ्यासाठी खोट बोलणारा
ठेच मला लागल्यावर दुखावणारा
माझ्या जखमेवर हळुवार फुंकर घालणारा
माझा ’दादा’..!!


अलगद कोडी घालणारा
गणित चुकल्यावर ’धपाटा’ देणारा
मग शंकांची उकल करणारा
खुप खुप धम्माल करणारा
माझा ’दादा’..!!


त्या दिवशीही मी त्याची वाट पाहिली
दमुन मग झोपी गेली
रात्री फोनची घंटी वाजली
तो ठेवल्यावर आई ओक्साबोक्शी रडली
.
.

कधी नव्हे ते बाबाही रडले होते
काय झाल ..?मला काहिच कळले नव्हते

’दादा’ला घ्यायला बाबा,काका गेले होते
मी सार नुसतच पाहत होते
.
.

१ जानेवारी ,२००८ उजाडले होते
थंड दादाला घेऊन सारे ’परतले’ होते
जुन्या वर्षाने सोबत दादाला नेले होते
माझे ’चैतन्य’ हरवले होते
’दादा’ने मला एकटे सोडले होते ........
कायमचे....!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा